Increase in Swab Examination in Bhiwandi : Commissioner Dr. Pankaj Ashya
स्वाब
तपासणी
मध्ये
वाढ,
खुदाबाक्ष
हालमध्ये
हॉस्पिटल,
तर
चाचा
नेहरू
हॉस्पिटल
येथे
कोरोना
केंद्र.-
आयुक्त
डॉ.पंकज
आशिया
प्रसिध्दी पत्रक
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण स्वाब तपासणी जी 50
नमुने तपासण्यात येत होती त्याची क्षमता वाढविण्यात आली असून महाराष्ट्र सरकारकडून रोज 300 मोफत तपासणी होणार आहेत,आणि सदरच्या तपासण्या आता टाटा आमंत्रा येथे होत होत्या त्या तपासण्या आता रईस हायसकूलमध्ये मध्ये होणार आहेत. तसेच जे खासगी टेस्ट करताना जास्त शुल्क घेत आहेत त्यावर देखील नियंत्रण आणण्यात येणार आहे. जे खाजगी लॅब चालक कोरोना तपासणी करणेकामी शासनाने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा जादा शुल्क आकारतील त्यांचे विरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे.
![]() |
Commissioner Dr. Pankaj Ashya |
तसेच खुदाबक्ष सांस्कृतिक केंद्र येथे 120 क्षमतेचे कोविड हॉस्पिटल चालू करण्यात येणार आहेत, तर त्याचा नेहरू शाळेत 150
बेड क्षमता असलेले सेंटर चालू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे रईस हायस्कूल येथे 400 बेड क्षमता असलेले हॉस्पिटल चालू करण्यात आले आहे. अशी माहिती आयुक्त यांनी दिली आहे. ताप येत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तातडीने महानगरालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ताप तपासणी केंद्र येथे संपर्क साधावा, तर नागरिकांनी स्वतः तपासणी करणेकामी पुढे यावे असे आवाहन देखील आयुक्त यांनी केले आहे.
Post a Comment